राळेगणसिद्धी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी



ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी साधला संवाद

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली. याप्रसंगी उपस्थित  ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. 

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज बांगर आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाले आहे. हे केंद्र तातडीने कार्यान्वित करण्यावर भर देण्यात येत असून केंद्रासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाला मान्यता देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच या प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी नूतन इमारतीतील तपासणी कक्ष, प्रसूती कक्ष, औषध वितरण विभाग, प्रयोगशाळा, लसीकरण कक्ष, आपत्कालीन सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्ण प्रतीक्षालयातील बसण्याची सोय यांची पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली.


आरोग्यमत्र्यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट

राळेगणसिद्धी येथे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post