माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : गणेश उत्सवानिमित्त जनसेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बहिरट यांच्या पुढाकाराने 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत खडकी गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थांसाठी मोफत देवदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.
या यात्रेमध्ये भाविकांसाठी चहा-नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे. देवदर्शनाचा मार्ग खडकी – सिद्धटेक – मोरगाव – जेजुरी – रांजणगाव असा निश्चित करण्यात आला असून संपूर्ण व्यवस्था प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरत असून ‘जनसेवक प्रतिष्ठानतर्फे सर्वांनी यात्रेत सहभागी होऊन देवदर्शनाचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment