भटके विमुक्त दिनानिमित्त खडकी येथे जातीचे दाखले वाटप

 


माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनानिमित्त खडकी येथे आदिवासी समाजातील कुटुंबांना जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात वाळकी गटाचे सर्कल अधिकारी बाळासाहेब नांदुरकर यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण झाले. या प्रसंगी पारधी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार माजी सरपंच अशोक कोठुळे व विजय काळे यांनी केला.


गावचे तलाठी बाबासाहेब दळवी यांचाही गावचे सरपंच भाऊसाहेब बहिरट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपसरपंच आदिनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठुळे, सामाजिक कार्यकर्ते अजित पवार, तसेच अनिल गोते, मतीन शेख, सुरेश उमाप, कानिफनाथ रोकडे, बाळासाहेब रोकडे, धनु काळे, संदीप चव्हाण, सोमनाथ भोसले, मंजाबापू काळे, छाया भोसले, संध्या चव्हाण, सोनाली भोसले (शिक्षिका) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संदीप चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भटके-विमुक्त समाजाच्या सन्मान, हक्क आणि ओळख प्रस्थापित करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post