माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : नगर–पुणे महामार्गावरील कामरगाव घाटाजवळील शेतात एका अंदाजे ४० वर्षीय अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली.
किशोर संभाजी ठोकळ यांच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला हा इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे पो.हे.कॉ. खंडेराव शिंदे, शरद दाते व स.फौ. रविंद्र डावखर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी त्यास मृत घोषित केले.
या घटनेची आकस्मात मृत्यूची नोंद नगर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू असून, कोणास याबाबत माहिती असल्यास पो.हे.कॉ. खंडेराव शिंदे (मो. ९९२२९४४५४६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment