माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद गावचे सुपुत्र डॉ. सचिन खेंगट यांना आयुष चिकित्सा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आयुष महासन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मुंबई येथे 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सोहळ्यात आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि MSME TDS मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाला सिने अभिनेत्री श्रेया बुगडे, चिखली विधानसभा आमदार स्वाती ताई महाले, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. नितीन पाटील, डॉ. प्रवीण जोशी तसेच आयएमए सदस्य उपस्थित होते.
डॉ. सचिन खेंगट हे योग निसर्ग उपचार क्लिनिकचे संचालक असून त्यांनी अनेक गरजू व गरीब रुग्णांची अत्यल्प खर्चात चिकित्सा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मिळालेला हा पुरस्कार अहिल्यानगर तालुक्यासह जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
आयुष महासन्मान पुरस्काराने डॉ. सचिन खेंगट सन्मानित झाल्याने त्यांचे विविध स्तरामधून अभिनंदन होत आहे.
Post a Comment