जिल्हा बॅक कर्मचारींना २५% बोनस
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक अतिशय भक्कम पायावर उभी असून बॅकेची यशस्वी वाटचाल चालू असून बॅकेवर सामन्य शेतकऱ्यांना बरोबरच ग्राहकांचा मोठा विश्वास असल्याने बॅकेची प्रगतीत उत्तरोत्तर वाढ होत असून या मध्ये बॅक सेवकांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केले. जिल्हा बॅकने कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस दिल्याबद्दल जिल्यातील बॅक कर्मचारी मोठ्या संख्येने बुर्हानगर येथील कर्डीले यांच्या निवासस्थानी आभार व्यक्त करणेसाठी आले असता आमदार कर्डीले बोलत होते.
ते पुढे म्हणाले जिल्हा बॅकेने सामन्य शेतकरी केंद्र बिंदू मानुन सतत आपले कामकाज करताना ग्रामीण भागाचा विकास केला आहे. त्यामुळेच जिल्हा बॅक जिल्ह्याची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते.बॅकेचे कर्मचारी ही शेतकऱ्यांचे असुन त्यांनीही बॅकेचा विकास करताना नवीन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर अवगत करून बॅकेची सेवा केली पाहिजे. बॅकेत कामकाज करताना बॅकेच्या संचालक मंडळ माझ्या शब्दाला नेहमीच किमंत देते त्याचाच एक भाग म्हणून आपलेला दिलेला बोनस होय. बॅक नेहमीच देशावर, राज्यावर संकट समयी सुध्दा मागे राहत नसुन काल राज्यात पाऊसारुपाने आलेल्या संकटासाठी बॅक १ कोटी ११ लाखाची मदत मुख्यमंत्री सह्याता निधीस लवकर देणार असल्याचीही माहिती कर्डीले यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेचे जिल्यातून प्रत्येक तालुक्यातील भहूसंख्य कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने चेअरमन शिवाजीराव कर्डीले आभार व्यक्त करण्यास आले होते या वेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतना कर्मचारी म्हाणाले की,चेअरमन आमदार कर्डीले साहेबांनी आमच्या वर भरघोस प्रेम केले आहे. ते नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी असतात. त्यांच्या कालखंडात कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून कर्मचारी अत्यंत समाधानी आहे. बॅकेच्या कर्मचाऱ्यांना इतिहासात श्री कर्डीले साहेबांनी ऐवढा मोठा दिला आहे त्याबद्दल चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले व बॅक सेवक आपल्या कामजात हयगय करणार नाही. चेअरमन आणि बॅक नेहमीच आमच्या पाठीमागे असल्यामुळे आम्हास काम करताना उत्साह असतो.
भरघोस बोनस दिल्याने जिल्हा बॅक कर्मचाऱ्यांत मोठे आनंदाचे वातावरण झाले आहे.
Post a Comment