जिल्ह्यात पावसाचा पूर; सीना नदीला पूर, नागरिकांच्या घरात पाणी

 



जिल्ह्यात एकाच दिवसात ८१ मि.मी. पाऊस – सीना नदीला पूर, जनजीवन विस्कळीत

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर  – जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून २४ तासांत तब्बल ८१ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळात अतिवृष्टी जाहीर झाली असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.











सीना नदीला आलेल्या पूरामुळे अंतिम चौकात नदीचे पाणी शिरले आहे. तसेच अनेक गावांमधील नद्यांना व ओढ्यांना पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील शेतजमिनी व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या वस्तीतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तसेच आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असून सतत पाहणी सुरू आहे.



"#Weather Information: Nowcast Warning

Date: 28-09-2025

Time of Issue: 1010 Hrs IST

Validity: 3 hours


Red Warning

Weather: Moderate to Intense spells of rain & Possibility of thunder/lightning accompanied with gusty winds in some areas.

Districts: Ahilya Nagar, Mumbai, Nashik, Palghar, Ghat of Pune, Raigad, Thane


Take Precautions

-IMD Mumbai"

✅ राहाता तालुक्यातील वाहतूक बंद असलेले मार्ग 🚧

अतिवृष्टीमुळे पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

🔴 शिर्डी – पुणतांबा रस्ता

🔴 अस्तगाव – श्रीरामपूर रस्ता

🔴 तीसगाव – लोहगाव रस्ता

🔴 रामपूरवाडी – वाकडी रस्ता

🔴 रामपूरवाडी – एकरुखे रस्ता

🔴 एकरुखे – पिंपळवाडी रस्ता

🔴 साकुरी – नादुर्खी रस्ता

🔴 राहाता – एकरुखे रस्ता

🔴 हसनापूर – दुर्गापूर – दाढ रस्ता

🔴 चितळी – एकरुखे रस्ता

🔴 तीसगाव – भगवतीपूर रस्ता

🔴 वाकडी – पांढरी वस्ती रस्ता

🔴 रुई – शिंगवे रस्ता

🔴 रुई – शिर्डी रस्ता

🔴 अस्तगाव – चोळकेवाडी रस्ता

🔴 एकरुखे – अस्तगाव रस्ता

🔴 राहाता – रांजणगाव खुर्द रस्ता

🔴 अस्तगाव – पिंपरी निर्मळ रस्ता

🔴 पिंपरी निर्मळ – आडगाव रस्ता

🔴 पिंपरी निर्मळ – गोगलगाव रस्ता

🔴 पिंपरी निर्मळ – राजुरी रस्ता

🔴 रांजणखोल – चारी क्र.७ रस्ता

🔴 आडगाव – लोणी रस्ता (बैल बाजारजवळ)

🔴 तीसगाववाडी – कडसकरवस्ती रस्ता

🔴 नांदूर बु – यादवमळा रस्ता

⚠️ नागरिकांनी या मार्गांचा वापर टाळावा व सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे. 🙏

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post