चौफेर व्यक्तिमत्व : राजेंद्र चोभे पाटील....

 


दिलखुलास व्यक्तिमत्व असे विशेषण लावायचे ठरले तर ते लावावे लागेल राजेंद्र चोभे पाटील यांना! शेकडो लोकांशी या माणसांचा रोज संपर्क असतो. माणसं कशी जोडायची आणि संबंध कसे कायम टिकवायचे,हे चोभे यांच्याकडून शिकावे!या व्यक्तीची मुशाफिरी सर्वच क्षेत्रात असते. शेती,राजकारण, समाजकारण पाहताना त्यांनी अनेक मान्यवरांना आपल्याशी जोडून घेतले आहे.त्यात आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे,अनेक मान्यवर अधिकारी,पुढारी यांचेशी त्यांचा दाट स्नेह आहे.

माणसं जोडणे म्हणजे समोरच्याला आहे तसे स्वीकारणे होय.आपली अपेक्षा, आपली मते न लादणे म्हणजे माणसं जोडणे होय.कौतुकाची एकही संधी न सोडणे  म्हणजे माणसं जोडणे होय.अशा पद्धतीने माणसं चोभे हे जोडत गेले. माणसांचा,मित्रांचा संग्रह त्यांची श्रीमंती दाखवतो.

चोभे यांची आगामी आळंदी (देवाची) येथे भरणाऱ्या  शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या मध्यवर्ती राज्यस्तरीय  संवाद संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.ही आनंदी आणि कौतुकाची बाब आहे. या निवडीबद्दल त्यांच अडसूळ एज्युकेशन कॅम्पस मध्ये ,एशियन नोबेल हॉस्पिटल व ,मिडिया प्रतिनिधी व आदर्श गाव योजनेचे बाजारचे ग्रामस्थांच्या वतीने कार्याध्यक्ष श्री.पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मान झाला आहे.

साहित्यामध्येही चोभे यांची मुशाफिरी दिसते.त्यांनी आतापर्यंत राष्ट्रसंत तनपुरे महाराज, ह.भ.प विठ्ठल महाराज देशमुख यांच्यावर पुस्तके लिहली असून मला भावलेली माणसं हे एक पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

ओळख असू,नसो ! चोभे पाटील ओळख काढणार, मित्राचे नाते तयार करणारच! गाव पातळी पासून तर मंत्रालयापर्यंत अधिकारी सचिव यांना सर्वांना अगदी जवळून ओळखण्याचा त्यांचा मोठा समूह आहे सर्वांशी सुसंवाद ठेवणार.त्यांची वृत्तपत्रांविषयी असणारी आवड,साहित्याची आवड ,लोकांशी सुसंवाद यात जणू त्यांचे व्यक्तिमत्व गुरफटून गेले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणासाठी अनेकदा मदतही केली आहे.त्याबद्दलही त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य संमेलने,साहित्यिक विषयी अनेक कार्यक्रम महत्वाची भूमिका घेऊन महत्त्वाची भूमिका घेऊन ते यशस्वी करून दाखवले आहे विशेषता अधिकारी वर्गात त्यांचा नगर जिल्ह्यातच नव्हे तर  मंत्रालयापर्यंत  संपर्क  आहे हे अगदीच खरे आहे त्यांनी राबविले आहेत.

चोभे आणि मी नगर महाविद्यालयातील पत्रकारिता अभ्यासक्रमाचे पाहिले विद्यार्थी!साधारण :१९९० चा तो काळ असेल.तेव्हापासून राजेंद्र आणि मी एकमेकांना ओळखतो.पुढे चोभे हे राहुरी कृषी विद्यापीठात नोकरीस लागले, मी मात्र पत्रकार क्षेत्रात रमलो.काही काळ त्यांनी पत्रकारिता केली.पण पुढे सरकारी नोकरी पकडली.मात्र असे असले तरीही चोभे यांची बहुतेक वृत्तपत्र कार्यालयात ऊठबस असतेच असते! नवे असो जूने असो,त्यांचा अनेक पत्रकारांची ओळख, संपर्क आहे.सर्वांशी संबंध चांगले ठेवून त्यांचा वावर सुरू असतो.मला वाटतं ते प्रत्येक वृत्तपत्राच्या वर्धापन दिनास हजेरी लावतात.  यालाच म्हणतात रंगात रंगुनी रंग माझा वेगळा!

आपला संसार नीटनेटका करून चोभे यांनी एक प्रकारे आदर्श निर्माण केला आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.पत्नी सुनीता या प्राथमिक शिक्षिका आहेत. मोठी मुलगी समृद्धी ही नाशिक येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे तर धाकटी मुलगी सृष्टी ही पुणे येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.लहान मुलगा श्रीकृष्ण हा शिक्षण घेत आहे.यामुळे उगाच नोकऱ्या आहेत, म्हणून उधळा पैशे!असे त्यांचे धोरण मात्र नाही. पैसा मोजून मापून वापरला गेला पाहिजे." जोडनिया धन उत्तम व्यवहारे,उदास वेचे करी" असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. त्याच प्रकारे चोभे यांचे धोरण आहे.

चोभे यांच्या मतानुसार जीवनातील हे यश सहजासहजी आलेले नाही.नगर तालुक्यातील आठवड हे चोभे यांचे गाव. वडील गोरक्ष चोभे जिल्हा परिषदेत नोकरीला होते. आई मंडाबाई यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले.डॉ.संजय चोभे हे चोभे यांचे धाकटे बंधू आहेत. शिक्षणाला फारसा त्रास झाला नाही. मात्र तरीही शेतीतील कष्ट चुकले नाही. स्वतच्या शेतीत काम करण्याबरोबर इतर ठिकाणीही शेतीची कामे करावी लागली. त्यामुळे कष्टाची कधी लाज बाळगली नाही. चोभे यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती.ती त्याच्या वडिलांनी निर्माण केली. ग्रंथालयातील पुस्तके,विविध मासिके ते वाचत गेले. साहित्य वाचन व लेखन यामुळे एक वैचारिक बैठक तयार होते. अशातूनच साहित्य चळवळीस ते जोडले गेले.

आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आपल्या कामाबाबत प्रशंसा केल्याचेही चोभे सांगतात. चोभे हे शब्दगंध साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद यामध्ये सक्रिय आहे. त्यांच्या नव्या निवडीचे स्वागत करण्याबरोबरच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊ या!

कैलास ढोले : जेष्ठ पत्रकार, अहिल्यानगर 

Mo. ९४२३४६२८३१

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post