पारनेरमध्ये संदेश कार्ले यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

 


पारनेर मधून उमेदवारी अर्ज दाखल / शिवसैनिकाची मोठी उपस्थिती

माय नगर वेब टीम 

पारनेर - पारनेर विधानसभा मतदार संघातून शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

 शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी झगडणारा नेता अशी संदेश कार्ले यांची ओळख आहे. पारनेर विधानसभा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी शिवसैनिकांची मागणी होती पण हा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवारांकडे गेल्याने संदेश कार्ले यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर तालुक्यातील चास ते पारनेर रैली काढत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post