माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर-सोलापूर रोडवरील अनेक ठिकाणी सुरु असलेला 'नाजूक' व्यवसाय कायम चर्चेत असतो. थेट आयजींच्या पथकाने छापा टाकूनही तेथील नाजूक व्यवसाय बंद होत नसल्याचे नगर तालुका व श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांच्या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच ग्रामीण डीवायएसपीही नाजूक व्यवसायांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात की असाच काहीसा सवाल नगर-सोलापूर रोडवरील नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित व्यवसाय चालक आपल्या हॉट्सॲपवर फुलांचे स्टेटस ठेवून कोडवर्डच्या माध्यमातून सध्या किती फुल उपलब्ध आहेत हे ग्राहकांना कळविले जाते. परंतू या हॉट्सॲपवरील फुलांच्या स्टेस्टसचे गौडबंगाल नेमकं काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात नाशिकच्या पथकाकडून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्यात नगर-सोलापूर रोडवरही छापा टाकून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. येथील नाजूक व्यवसाय नाशिकच्या पथकाला सापडतात. परंतू स्थानिक असलेल्या नगर व श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या पोलिसांना सापडत नाहीत का, नेमके पोलिस काय करतात, असा सवाल नागरिक करित आहेत. नागरिकांनी वारंवार आवाज उठवूनही एसपी, ग्रामीण डीवायएसपी यांच्याकडूनही याप्रकरणांकडे डोळेझाक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून याबाबत आता थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयजींकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले जात आहे. आता याबाबत एसपी कोणती भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
होमगार्डच्या माध्यमातून होतेय 'मलिदा' जमा करण्याचे काम!
नगर तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. नगर तालुका पोलिस अवैध धंदे रोखण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यातच नगर तालुक्यातून जाणाऱ्या सर्वच महामार्गावर 'नाजूक' व्यवसाय तेजीत आहेत. या व्यवसायांकडे पोलिसांची अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. नगर-सोलापूर रोडवर सुरु असलेल्या 'गोरे', 'पठारे बंधू' आणि 'घोडके' यांच्या धंद्यांना पोलिसांचे खुले पाठबळ आहे का असाच सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. होमगार्ड असलेल्या एकाच्या माध्यमातून येथून 'मलिदा' जमा करण्याचे काम केले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
Post a Comment