आद्य स्वामी शिवानंद दादाजी नामाने श्रीक्षेत्र खंडाळा नगरी दुमदुमली



महारुद्र याग,  महारुद्राभिषेक, दादाजी प्रकट दिन, रक्तदान, मोतीबिंदू शिबीर उत्सहात

माय नगर वेब टीम 

अहमदनगर:  आद्य स्वामी शिवानंद दादाजी, धुनी द्वारिका मैया नामाने श्रीक्षेत्र खंडाळा नगरी तीन दिवस दुमदुमली. दादाजी नामात भक्तगन भक्ती रसात न्हाहून निघाले.यावेळी  दादाजींनी जीवनाचा मुलमंत्र दिला.  



आद्य स्वामी शिवानंद दादाजी व धुनी द्वारिका मैय्या यांच्या कृपाशिर्वादाने श्री श्री. धुनीवाले धनंजय सरकार व माऊली माताजी श्री क्षेत्र पिंपळनेर (परमधाम) ता. साक्री, जि. धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र खंडाळा, ता.नगर येथे भव्य महारुद्र याग, महारुद्राभिषेक व आद्य स्वामी शिवानंद दादाजी प्रकटदिन सोहळा, रक्तदान, मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी भव्य महारुद्र, महायज्ञ व महारुद्राभिषेक सोहळा पार पडला. दादाजींनी अनमोल असे ज्ञानदान केले. दुसऱ्या दिवशी ध्यानयोग साधना शिबीर, हवन, सत्संग, ज्ञानदान पार पडले. 



मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी आद्य स्वामी शिवानंद दादाजींचा प्रकट दिन सोहळा, भव्य रक्तदान शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले. स्वामींच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 80 जणांनी रक्तदान केले. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाचा उत्सह वाढवला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, ओम विश्वात्मक शिवानंद दादाजी ट्रस्टचे सल्लागार संदेश कार्ले यांच्यासह खंडाळा दरबारच्या गुरुबंधू यांनी मोठे परिश्रम घेतले. 



कार्यक्रमाला खासदार लंके, गाडे, पाचपुते यांची हजेरी

आद्य स्वामी शिवानंद दादाजी श्रीक्षेत्र खंडाळा येथे तीन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते. या कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंके, उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा बँक संचालक  दत्तात्रय पानसरे,  माजी सभापती काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, बाळासाहेब हराळ, प्रविण कोकाटे, रामदास भोर, संदीप गुंड,  जिल्हा परिषद माजी सदस्य माधवराव लामखडे, शरद झोडगे, प्रकाश कुलट यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, भाविक भक्त यांनी कार्यक्रमास हजेरी लावली.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post