माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर येथील यशश्री प्री स्कूलने शिक्षण क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा निर्माण केला असल्याची प्रतिक्रिया पालक वर्गांमधून व्यक्त केली जात आहे. पालकांची पसंती अन् चिमुकल्यांना आवडती शाळा म्हणून यशश्री प्री स्कूलने नावलौकिक मिळवला आहे.
उत्तम व्यवस्थापन.... अनुभवी प्रशिक्षित शिक्षक.... विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष.... सुसज्ज क्लास रूम.... प्रशस्त मैदान....वर्षभर नवनवीन उपक्रम.... विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापनाकडून होत असलेले प्रयत्न.... अन् यामधून विद्यार्थ्यांमधील दिसून येत असलेली गुणवत्ता, प्रगती यामुळे जेऊर पंचक्रोशीतील बहुतेक पालक आपल्या चिमुकल्यांच्या उज्वल भविष्यासाठी यशश्री प्री स्कूलला प्राधान्य देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यशश्री प्री स्कूलने सुरुवातीपासूनच अभ्यास.. शिस्त.. मैदानी खेळ.. हसत खेळत शिक्षण.. विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत पालकांशी संवाद.. विद्यार्थ्यांमध्ये समानता, एकीची भावना जोपासण्यासाठी सर्व सण उत्सव, महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा आत्मसात केल्याने यशश्री प्री स्कूल विद्यार्थ्यांसह पालकांच्या पसंतीस उतरले आहे.
बालपणीच भविष्यातील शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे कार्य यशश्री स्कूलचे शिक्षक अविरतपणे करत आहेत. मर्यादित प्रवेश दिले जात असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देण्यात येते. संस्कृती व परंपरेचे जतन करण्याकडे देखील यशश्री स्कूल प्राधान्य देत असते.
यशश्री प्री स्कूलमध्ये नवीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मर्यादित प्रवेश असल्याने यशश्री स्कूलच्या व्यवस्थापनाकडून प्रवेशासाठी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
_______________
NURSERY / LKG / UKG
प्रवेशासाठी संपर्क
प्राचार्या - सौ. मनीषा पवार
7020897049 ! 9527553108 ! 8999172233
---------------------
Post a Comment