गॅलेक्सी नॅशनल स्कूलमध्ये योगा दिन उत्साहात साजरा

 माय अहमदनगर वेब टीम 

नगर  तालुका( शशिकांत पवार): गॅलेक्सी नॅशनल स्कूल प्री प्रायमरी सावेडी आणि गॅलेक्सी नॅशनल स्कूल वडगाव गुप्ता या दोन्ही शाळेंमध्ये योगा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना योगा विषयीचे महत्व व त्यापासून शरीरात होणारे फायदे याविषयी माहिती देण्यात आली. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योगाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न त्याचप्रमाणे त्याची आपणास किती गरज आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. मोठ्या विद्यार्थ्यांबरोबरच लहान चिमुकल्यांनी सुद्धा यामध्ये आपला सहभाग अतिशय आनंदाने नोंदवला. त्याचबरोबर प्रात्यक्षिके सुद्धा शिक्षक शिक्षिकांच्या बरोबर अतिशय सुंदर अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला.

       कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले त्याचप्रमाणे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र साताळकर ,कार्यकारी  विश्वस्त उषा देशमुख ,संचालिका देविका देशमुख, मुख्याध्यापिका क्षितिजा हडप, फिजिकल डायरेक्टर राजू पवार यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांच्या प्रात्यक्षिकांबद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.


गॅलेक्सी नॅशनल स्कूल प्री प्रायमरी सावेडी तसेच गॅलेक्सी नॅशनल स्कूल वडगाव गुप्ता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतात. त्यांच्या व्यवस्थापनाचे पालक वर्गातून देखील कौतुक करण्यात येत आहे.

_________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post