मनसेच्या नितीन भुतारे यांनी भरविली आगळी वेगळी स्पर्धा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सोबत त्यांच्या मोबाईलवर फोन करून सर्वसामान्य नागरिक बोलला व त्या नागरिकाचे काम एकूण घेऊन खासदारांनी ते मार्गी लावले असे एक उदाहरण कॉल रेकॉर्डिंग आणून दाखवा आणि 1000 रुपयांचे रोख पारितोषिक घेऊन जा अशी आगळी वेगळी स्पर्धा मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी भरविली आहे.
त्या स्पर्धेचे पोस्टर त्यांनी एस टी स्टँड वर जाऊन मतदार संघातील पाथर्डी, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहुरी या जाणाऱ्या एस टी बसेस वर लावले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की खासदार डॉ सुजय विखे हे निवडून आल्या पासून ते 1मार्च 20024 पर्यंत कोणत्याही एका सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना त्यांच्या मोबाईलवर आपल्या नागरी समस्ये करिता फोन लावला व सुजय विखे पाटील त्यांच्याशी बोलले आणि समस्या सोडविली असा एक फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला दाखवावी. त्याला 1000 रुपयांचे रोख पारितोषिक नितीन भुतारे देतील.
ही स्पर्धा आयोजित करण्याचे कारण संपूर्ण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील कोणत्याही नागरिकांकडे डॉ सुजय विखे पाटील यांचा मोबाईल नंबर नाही. कधीही ते जनतेच्या संपर्कात नाही कोणतेही ठोस काम नसल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तालुक्या तालुक्यात ऑर्केस्ट्रा गाण्यांचे शो आयोजित करण्यात येत आहे. व त्या मध्ये मे हुं डॉन या गाण्यावर नाचून मत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून किती लोकांचे काम त्यांनी मार्गी लावले हे समजेल व खरा चेहरा त्यांचा जनतेसमोर येईल अशी टीका मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी केली आहे. त्यांच्या अश्या या आगळ्या वेगळ्या स्पर्धेमुळे भाजपा मोठ्या अडचणीत सापडली आहे. या स्पर्धेची चर्चा नगर जिह्यात होत आहे.
 

Post a Comment