'रत्नदीप'च्या विरोधातील उपोषण विद्यापीठाच्या लेखी आश्वासना नंतर मागे, आ. लंके यांचे मोठे आश्वासन



माय अहमदनगर वेब टीम 

जामखेड -  रत्नदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षाविरोधात माणसिक, शाररीक, शैक्षणिक व आर्थिक लुट प्रकरणी  जामखेड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व हिंदुस्थान प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांचे सुरू असवलेले उपोषण विद्यापीठाच्या लेखी आश्वासना नंतर अकराव्या दिवशी आ. निलेश लंके यांच्या हस्ते लिंबुसरबत देण्यात आले व उपोषण, आंदोलन स्थगित केले. यावेळी आ. निलेश लंके विद्यार्थ्यांच्या पाठीशी जाहीर करून सर्व तो मदत करण्याचे ग्वाही दिली. दरम्यान उपोषण सुटल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थीनी डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात वैयक्तिक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्या यामुळे डॉ. मोरे याच्यावर आणखी गुन्हे दाखल होणार आहे. 

     रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, शारिरीक, माणसिक, अर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी रत्नदीप संस्थेच्या सात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ५ मार्च पासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला पाठिंबा व त्यांना न्याय मिळावा देण्यासाठी हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, रिपब्लिकन पक्षाचे सुनिल साळवे, मनसेचे प्रदीप टापरे, हवा सरनोबत, डॉ. भगवान मुरूमकर यासह सर्व राजकीय पक्ष तसेच आ. रोहीत पवार, व आ. राम शिंदे यांनी सदर आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न धसास लावले. 

    शुक्रवारी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, लोणारे रायगड विद्यापीठाचे नोडल अधिकारी नियुक्त केले तसेच नजीकच्या महाविद्यालयात परिक्षा घेण्यात येईल असे लेखी पत्र तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते प्राप्त झाले. सदर संस्थेच्या परवानगी रद्द करण्याबाबत प्रक्रिया चालू आहे, विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे मिळवून देण्याचे सुचीत करण्यात आले त्यानंतर आंदोलनकर्ते विद्यार्थी व उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी उपोषण माघे घेण्याचा निर्णय घेतला. 

     यावेळी आ. रोहीत पवार यांनी मोबाईलवरून विद्यार्थी व उपोषणकर्ते यांच्याबरोबर संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बांधील असून तुमची आगाऊ घेतलेली फी व कॉलेज बंद होईल यासाठी मी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. 

     दरम्यान आपल्या आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघालेले आ. निलेश लंके यांनी उपोषणास्थळी भेट दिली. विद्यार्थ्यांचे अकरा दिवस चाललेले आंदोलन यशस्वी करण्याचे काम पांडुरंग भोसले यांनी केले. समाजात अशा प्रवृत्ती ज्यावेळी काम करतात त्यावेळी कोणीतरी पुढे आले पाहिजे. पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नऊ दिवस उपोषण केले तो गोरगरिबांसाठी लढणारा यौध्दा आहे. याकामी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, रिपब्लिकन पक्षाचे सुनील साळवे, केदार रसाळ, रमेश आजबे, हनुमंत पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला. तहसीलदार गणेश माळी यांनी चांगले काम केले. तिनही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सदर कॉलेज बंद करून या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये समायोजन करण्याचे लेखी दिले आहे. यापुढे काही मदत लागल्यास ती करू असे आश्वासन दिले. 

          

   रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाने विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार केला यामुळे आपण जामखेडचे नागरीक म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहिलो याकामी सर्वांनी साथ दिली. तहसीलदार यांची खूप मदत झाली. आ. रोहीत पवार, आ. राम शिंदे यांनी खूप सहकार्य केले. आ. निलेश लंके यांनी वेळेत वेळ काढून येऊन पाठिंबा दिला, विद्यापीठ कुलगुरू त्यांच्या समितीने दिलेले अहवाल सकारात्मक होते.

पांडुरंग भोसले - तालुकाध्यक्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post