अजितदादा माझ्याविषयी 'तसा' निर्णय घेणार नाहीत ; नेमकं काय म्हणाले आमदर लंके....

 


अहमदनगर / नगर सह्याद्री –

अजित पवार गटातील आमदार निलेश लंके शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार अशा चर्चा सध्या सूरू आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या चर्चेवरून निलेश लंकेंना इशारा दिला होता. त्यावर आता लंके यांनी यावर उत्तर दिलं आहे.


अजित पवार तसं काही करणार नाहीत. कोणत्याही प्रकारे गैरसमज करण्यात काहीच अर्थ नाही. अजित दादा माझ्या राजकीय कारकिर्दीला कोणता धक्का लागेल असा विचार करणार नाहीत, असं निलेश लंकेंनी म्हटलं आहे.


काय म्हणाले होते अजित पवार

निलेश लंके खासदारकीसाठी इच्छूक आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी चुकीची भूमिका घेऊ नये, असं मला वाटतं. काल माझ्या भेटीला आला होता. त्याच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची हवा घातली आहे. निलेश लंके असा पक्ष सोडून जाऊ शकत नाही. त्याला राजनामा द्यावा लागेल असं त्याला मी सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.


माध्यमांशी बोलताना देखील आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. मला लोकांचे कॉल आले भविष्याच्या राजकारणासाठी मोठ्या साहेबांबरोबर गेले तर त्या पद्धतीने विचार करा. जनमाणसांची भावना आहे की आपण लोकसभा निवडणूक लढली पाहिजे, असं लंके म्हणाले. दक्षिण मतदार संघातील लोकांची भावना आहे की मी निवडणुकीला उभे राहिले पाहिजे. आम्ही सर्व एकाच विचारधारेत काम करणारी माणसं आहोत. सर्व समाजातील वंचित घटकांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत, असंही लंकेंनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post