जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-ना.विखे पाटील / टंचाई नियोजनाचा आराखडा तयार करण्याच्या पालकमंत्र्याच्या सूचना
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -
अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये. तसेच टंचाई नियोजना संदर्भातील सर्वे कामे तातडीने पुर्ण करा ! असे निर्देश जिह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हा टंचाई निवारण नियोजन संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली शासकीय निवासस्थान मुंबई येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन बैठक दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव कर्डिले, यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे आ.श्रीमती मोनिकताई राजळे, आमदार श्री. लहू कानडे, आमदार श्री. प्राजक्त तनपुरे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी येणाऱ्या टंचाई काळात जिल्ह्यातील पाणीसाठा, जनावरांचा चारा, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा सविस्तर आढावा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सुचना आणि तक्रारी ऐकुन घेत त्यांचे निसरन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा इतर अधिकाऱ्यांना दिले. तसेच तातडीने टंचाई निवारण आराखडा करण्यासाठी सांगितले.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, टंचाई काळात पाण्याचे नियोजन नीट करण्यात यावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, शहर तसेच ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना आखाव्यात, ज्या भागात पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्या ठिकाणी तातडीने टॅंकरने पाणी पुरवठा वाढवावा, तसेच ग्रामीण भागात जिथे टॅंकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही त्या ठिकाणी बैलगाड्यांच्या सहाय्याने पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी. प्रभावीत गावात पाण्यासाठी पाणी संचय टाक्या उभारण्यात याव्यात. नवीन पाणी पुरवठा योजना राबविताना कार्यरत असलेला पुरवठा प्रभावित होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहू नये, त्यासाठी शहरी तथा ग्रामीण भागातील पाणी साठ्याची पाहणी करून त्याचे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी नियोजन करावे असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. टंचाई निवारण संदर्भात आवश्यक असेलल्या सर्व शासकीय परवानग्या, निविदा प्रक्रिया तातडीने पुर्ण करून टंचाई निवारण आराखडा पुर्ण करावा त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे मागणी करावी. या सर्व प्रक्रिया तातडीने पार पाडून नागिराकंना दिलासा द्यावा असे पालकमंत्री म्हणाले.
या बैठकीत जिल्ह्यात जनावरांसाठी चारा आणि पाणी कमी पडणार नाही यांनी याची सुद्धा काळजी प्रशासनाने घ्यावी. त्याच बरोबर सततचा पाऊस, गारपिठ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा सुद्धा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत उपस्थित असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भोसपुरी १६ गावांच्या पाणी पुरवठा योजना पार्थर्डी, शेवगाव येथील पाणी पुरवठ्याच्या बाबत प्रश्न उपस्थित करून तातडीने या गावातील पाण्याची समस्या मार्गी लावण्याची सूचना बैठकीत केली.
Post a Comment