धक्कादायक! शिक्षकाने फासला माणुसकीला काळिमा, नगरमध्ये घडला विचित्र प्रकारमाय अहमदनगर वेब टीम 

 अहमदनगर - ‘प्रॅक्टीकलला पैकीचे पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहितरी द्यावे लागेल, असे म्हणून शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर शहरातील एका महाविद्यालयात सदरची घटना घडली असून याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीष शिर्के (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरात राहत असून एका महाविद्यालयात शिक्षण घेते. सध्या तिचे प्रॅक्टीकल सुरू असून शिर्के हा त्या शाळेचा शिक्षण आहे तो फिर्यादीच्या एका विषयाचे प्रॅक्टीकल घेत आहे. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी विद्यालयात असताना शिर्के तिला म्हणाला,‘तुला प्रॅक्टीकलला पैकीचे पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहितरी द्यावे लागेल’, परंतू फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान फिर्यादीला प्रॅक्टीकलला शून्य मार्क दिल्याने त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ती 8 फेब्रुवारी रोजी शिर्के याच्या कॅबिनमध्ये गेली असता त्याने लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने अश्‍लिल हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

घडलेला प्रकार फिर्यादीने घरी सांगितला व काल, शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post