खासदार विखेंचे 'या' तालुक्याला मोठे गिफ्ट; रविवारी कर्डीले, जगताप, पाचपुते यांच्या उपस्थितीत श्रीगणेशा अहमदनगर तालुक्यात विविध विकास कामांचा खा. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते, आ. बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व आ.संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभारंभ कार्यक्रममाय नगर वेब टीम 

अहमदनगर - 

अहमदनगर तालुक्यातील विविधविकास कामांचा शुभारंभ खा डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व श्रीगोंदाचे आ.बबनराव पाचपुते जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या रविवार दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी संपन्न होणार आहे. यात प्रामुख्याने 50 कोटी रुपयांची घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३४४ लक्ष रुपयांच्या वाळकी ते वाळुंज रस्ता डांबरीकरण तसेच ग्रामपंचायत कार्यालय इमारत ४२ लक्ष रुपये यासह इतर विविध विकास कामांचा शुभारंभ वाळकी येथील मारुती मंदिर, येथे सकाळी ८.३० वा संपन्न होणार आहे. मौजे खडकी आगडगाव, डोंगरगण व शिंगवे नाईक ता नगर येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शिंगवे नाईक ते वांबोरी रस्ता डांबरीकरण करणे, या ३०० लक्ष रुपये कामांचा, बांधकाम विभागाअंतर्गत ३०० लक्ष रुपये खर्चून खडकी ते सारोळा कासार रस्ता दुरुस्ती काम याबरोबरच प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत १०० लक्ष रुपये खर्चून आगडगाव येथील भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण काम तसेच वनविभागाच्या डोगरगण येथील जैवविविधता उद्यानाच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.अहमदनगर शहरात विळद बाह्यवळण रस्ता ते डीसीपी चौक या चौपदरी रस्ताच्या दुरुस्तीचे काम, एमआयडीसी महामंडळाच्या निधी अंतर्गत सह्याद्री चौक ते सनफार्मा चौकातील पेव्हर ब्लॉक बसवून फूटपाथ तयार करणे, ९७ लक्ष रुपये कामांचा शुभारंभ  नव नागापूर येथील सह्याद्री चौकात साय ४.३० वा संपन्न होणार असून या कार्यक्रमास खा डॉ सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आ. संग्राम जगताप व महापौर रोहिणी शेंडगे,जिल्हाद्यक्ष दिलीप भालसिंग शहरअध्यक्ष अभय आगरकर यांच्या  प्रमुख उपस्थित होणार आहे.तसेच मौजे निंबळक व इसळक ता नगर येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ९३५ लक्ष रुपयांच्या निंबळ्क- इसळक- खातगाव- खारेकर्जूने रस्ता दर्ज्याउनतीकरण काम या सह १८५ लक्ष रुपयांच्या इतर विविध विकास कामांचा  शुभारंभ  निंबळक येथील  दत्ता मंदिर चौकात  सायंकाळी ५.३० वा होणार आहे.या सर्वविकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी,  महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर तालुका व अहमदनगर शहराच्या वतीने करण्यात आले आहे.0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post