माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका ( शशिकांत पवार)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमी संचलित यशश्री प्री स्कूलने पंचक्रोशीत आपल्या कार्यकर्तृत्वातून शिक्षण क्षेत्रात वेगळाच ठसा निर्माण केला आहे. जेऊर प्री स्कूलकडे सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविणारे 'माहेरघर' म्हणून पाहिले जाते. वर्षभर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविणारे एकमेव स्कूल म्हणून यशश्री प्री स्कूल जेऊरचे नाव घेतले जाते.
अनुभवी उच्चशिक्षित शिक्षक, उत्तम प्रशासन, सुसज्ज इमारत, निसर्गरम्य वातावरण, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम, खेळ, सर्व सण उत्सव, महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साज-या केल्या जातात. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, कडक शिस्त, आरोग्य, संचालिका अनुरीता शर्मा, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार, प्राचार्या सौ. मनीषा पवार यांचे योग्य मार्गदर्शन यामुळे येथे घडत आहेत सर्व गुण संपन्न विद्यार्थी.
शिक्षण क्षेत्रात मुलांचा पाया भक्कम झाला तरच विद्यार्थी पुढे यशस्वी होतात. त्यामुळे नर्सरी, एलकेजी, युकेजी या वर्गांकडे खास लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यात येतो. हसत खेळत शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची गोडी निर्माण होते. प्रत्येक शनिवारी डान्स, म्युझिक, खेळ याचे खास प्रशिक्षण देणारे हे एकमेव स्कूल आहे. तसेच सुंदर हस्ताक्षर, उत्तम वकृत्व अन् सराव परीक्षा यासाठी विशेष नियोजन यामुळे यशश्री प्री स्कूल जेऊरने पंचक्रोशीत शिक्षण क्षेत्रात चांगलाच नावलौकिक मिळवला आहे.
मर्यादित प्रवेश दिले जात असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांवर शिक्षक तसेच प्रशासनाचे लक्ष असते. पाल्याबाबत पालकांशी वारंवार संवाद साधण्यातही स्कूल आघाडीवर असून पाल्याच्या प्रगतीसाठी पालकांना सहभागी करून घेण्याचे कसब यशश्री प्री स्कूलच्या प्रशासनाने आत्मसात केले आहे. त्यामुळे येथे प्रवेश घेऊन पालकही निश्चित राहत आहेत.
_________________________________
नूतन वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
नूतन वर्षाच्या * नर्सरी * एलकेजी * युकेजी प्रवेश प्रक्रियेला जेऊर प्री स्कूल येथे सुरुवात झाली आहे.
* मर्यादित प्रवेश *
* प्रवेशासाठी संपर्क - प्राचार्या सौ. मनीषा पवार मो. ७०२०८९७०४९
________________________________
Post a Comment