लिटिल वंडर्स स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

  माय अहमदनगर वेब टीमनगर तालुका (शशिकांत पवार) - नगर तालुक्यातील जेऊर येथील लिटिल वंडर्स स्कूल व विजड्म हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    शिक्षिका सौ. कल्पना वड्डेपल्ली व सौ. ज्योती तोडमल यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थिनी श्रावणी भगत हिने यावेळी बोलताना आपली मायबोली म्हणजेच मराठी भाषा दिवस. १ मे १९६० रोजी मराठी भाषेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम करून मराठीला शासकीय कारभाराची भाषा ठरविली गेली. आणि मराठीला राज्य भाषेचा दर्जा देण्यात आला असल्याचे सांगितले.

      प्राची जवरे हिने आपल्या भाषणात सांगितले की, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची जयंती आहे. म्हणून हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षिका सुलताना तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले की इंग्रजी भाषा ही जरी जागतिक दळणवळणाची भाषा असली तरी तिचा वापर करीत असतानाच मायबोली वरचे प्रेम कमी होता कामा नये.

    प्राचार्य के.व्ही. दुबे यांनी सांगितले की, साहित्य वाङ्ममय, नाटक, कथा, कादंबरी, कविता, चारोळ्या, पोवाडा, भारुड इत्यादी गोष्टींनी समृद्ध असणाऱ्या मराठी भाषेचा आदर करण्यात यावा असे आवाहन केले.

      मराठी भाषा दिन शाळेच्या संचालिका सौ. स्वाती चेमटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post