माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील यशश्री प्री स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जेऊर प्री स्कूल मधील शिवजयंती सोहळा पंचक्रोशीतील नागरीकांसाठी कौतुकाची बाब ठरली.
शाळेतील चिमूरड्यांचे कौतुक पाहण्यासाठी पालक तसेच नागरीकांनी गर्दी केली होती. हर घर शिवबा या संकल्पनेला पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमध्ये शिवबा व मुलीमध्ये जिजाऊ साकारली व या कार्यक्रमाला शोभा आणली. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या जन्मापासून करण्यात आली बाल वयातच शिवरायांवर राजमाता जिजाऊंनी कसे संस्कार केले व त्यांच्या शिक्षणाची झालेली सुरुवात जिजाऊच्या भूमिकेतील मुलींनी सादर केली.
नर्सरी क्लास मधील आराध्या टापरे व यु.के.जी. क्लासची यज्ञा इंगळे यांनी जिजाऊची भूमिका साकारली. कृष्णा तवले याने शिवबाची आकर्षक वेशभूषा केली होती. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवरायांची राजमुद्रा. एल.के.जी. क्लास मधील आदेश मगर या चिमूरड्याने शिवरायांची राजमुद्रा तसेच शिवराज्याभिषेकातील दोन ओळी बोलवून दाखवत सर्वांची मने जिंकून घेतली. बाल वयातच मुलांवर झालेले संस्कार मुलांसाठी किती आदर्श ठरतात हे त्याने सिद्ध केले.
त्यानंतर शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमांमध्ये रंगत आणली या कार्यक्रमांमध्ये प्री स्कूलच्या सर्व मुला मुलींनी सहभाग नोंदवला. आकर्षक वेशभूषा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. जय भवानी जय शिवाजी या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
__________________
प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
विविध कला गुणांचा अविष्कार असलेली यशश्री प्री स्कूल जेऊर शाखा शैक्षणिक वर्ष 2023- 24 साठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध खेळ, कलेमध्ये यशस्वी होत असलेले विद्यार्थी. उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक, निसर्गरम्य वातावरण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष असे अनेक वैशिष्ट्य असलेल्या जेऊर प्री स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
प्रवेशासाठी
संपर्क यशश्री प्री स्कूल जेऊर
सौ. मनीषा राजेंद्र पवार 7020897049
_______________________
Post a Comment