खडकी येथे शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरीमाय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर- नगर तालुक्यातील खडकी येथे शिवजयंती ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्री तुळजाभवानी विद्यालय व ग्रामस्थाच्या वतीने मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.दरवर्षी शिवजयंती निमित्त खडकी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, श्री तुळजाभवानी विद्यालय व ग्रामस्थानी एकत्र येत भव्य मिरवणूक काढत शिवजयंती साजरी केली.मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांनी दांडपट्टा व काठीचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामुळेच मिरवणूक आणखीनच रंगतदार झाली. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले. मिरवणुकीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post