यशश्री अकॅडमी मध्ये राजाभाऊ कोठारी यांचा वाढदिवस आनंदात साजरा

माय अहमदनगर वेब टीम 



नगर तालुका- यशश्री अकॅडमी चे Trustee व मार्गदर्शक राजाभाऊ कोठारी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न दूरदर्शी नेतृत्व आणि अकॅडमीला सुरुवातीपासून अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे राजाभाऊ कोठारी यांचा वाढदिवस अकॅडमीमध्ये अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने करण्यात आली विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे ग्रीटिंग कार्ड बनवून आपल्या मनातील भावना नवनवीन संदेशातून व्यक्त केल्या विद्यालयातील सर्वांचे माझ्या प्रती असणारी प्रेम सन्मान आणि आदर पाहून मी भारावून गेलो आहे तसेच माणसाने माणसाशी माणसाबरोबर कसे वागावे हा माणुसकीचा भावार्थ सांगणारे मनोगत त्यांनी व्यक्त केले कोठारी सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक वर्गाने उपस्थिती दर्शवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post