निंबळक येथील रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा

माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक येथील सायली हॉटेल ते बायपास रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी दिला आहे.

     हॉटेल सायली ते बायपास रस्ता सद्यस्थितीत खराब झालेला आहे. रस्त्यावर दररोज मोठी वर्दळ असते. हाच रस्ता एम.आय.डी.सी. तसेच नगर शहरात जात आहे. निंबळक तसेच परिसरातील नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे.

      खराब रस्त्यामुळे येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दि. १७ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच प्रियंका लामखडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post