जास्त पैशांची मागणी केल्याबाबत विचारणा केल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण

 


पारनेरच्या स्वप्नील सोबलेवर गुन्हा दाखल
माय अहमदनगर वेब टीम

पारनेर - माथाडी कामगारांना कामावर लावून काम स्वतः काम न करता फुकट हजेरी लावणे तसेच ट्रान्सपोर्ट गाडीचालक यांच्याकडे जास्त पैशाची मागणी केल्याबाबत विचारणा केली असता कामगाराने शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वप्नील सोबले (रा. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे, मूळ पत्ता- सोबलेवाडी ता. पारनेर) यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन नारायण कोडे (वय 35 वर्ष, रा. धाडगेमळा, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नील सोबले हा माथाडी कामगारांना कामावर लावून स्वतः काम न करता फुकट हजेरी लावत होता. तसेच सप्टेंबर 2022 पासून अनलोडींग करीता येणार्‍या ट्रान्सफोर्टचे गाडी चालक यांची पावती न करता त्याच्यांकडून पैसे घेऊन सदर पैसे मुकादम अथवा माथाडी बोर्डाकडे भरायला न देता स्वतःकडे दिवसाला एक हजार ते दीड हजार रुपये ठेवत होता. तसेच ट्रान्सपोर्टचे गाडीचालक यांच्याकडे जास्त पैशाची मागणी करुण खंडणी मागत होता. याबाबत विचारणा केली असता स्वप्नील सोबले याने मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन शिवीगाळ करुन दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसीे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post