बापरे! विवस्त्र करुन दोघांना बेदम मारहाणचौघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

माय नगर वेब टीम 

अहमदनगर - प्रेम प्रकरणाच्या कारणावरुन मार्केटयार्डच्या मागील बाजूस दोघांना विवस्त्र करुन, मोबाईलमध्ये फोटो काढून बॅग, लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मयूर छबुराव कांडेकर, प्रतिक शिरसाठ, रोहित ईवळे (रा. तुळलाभवानी कॉलनी, सारसनगर, अहमदनगर) व एक अनोळखी यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुष सुनील कानडे (वय 15, नवीन पुलाजवळ, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की 18 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 8.40 वाजता माझ्या फोनवर मयुर कांडेकर याचा फोन आला होता. तो मला म्हणाला मागील बाजूस मी उभा आहे, तु लवकर येथ येे, तुझ्याकडे महत्त्वाचे काम आहे. असे म्हणाल्यावर मी माझा मित्र सोहम बाळासाहेब धामणे याच्यासोबत गेलो. तेथे गेल्यावर मयुर कांडेकर, प्रतिक शिरसाठ, रोहित इंवळे व एक अनोळखी व्यक्ती होता. मी त्यांच्याजवळ जाताच मयुर कांडेकर व प्रतिक शिरसाठ यांनी मला तू आमच्या प्रेम प्रकरणाची समाजात चर्चा का करतो, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मला विवस्त्र करुन खाली पाडुन बॅग व लाथा-बुक्कयांनी मारहाण केली. तसेच मारहाणीचे फोटो काढले. त्यानंतर मयुर कांडेकर याने माझा मित्र जयंत विजय मिसाळ याला फोन करून बोलावून घेतले. त्याला देखील मयुर कांडेकर व प्रतिक शिरसाठ यांनी तू आमच्या प्रेमप्रकरणाची समाजात चर्चा का करतो असे म्हणून विवस्त्र करून लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच मयुरने तुम्ही दोघांनी जर तुमच्या घरच्यांना सांगितले तर तुम्हाला व तुमच्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही. सगळयांना मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यांनतर 19 आक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता मयुर कांडेकर याचा फोन आला. तु आत्ता लगेच भोसले लॉन, भवानीनगर येथे ये. असे म्हणाल्यावर मी लगेच तेथे गेलो असता तेथे जयंत मिसाळ याला मयुर कांडेकर विवस्त्र करून लाथाबुक्कयांनी व प्रतिक शिरसाठ लोखंडी चौकोनी पाईपने मारहाण व शिवीगाळ करून मोबाईलमध्ये फोटो काढत होते. त्यानंतर त्यांनी मलाही विवस्त्र करुण लोखंडी पाईपने मारहाण केली. मारहाणीचे मोबाईलमध्ये फोटो काढले. मारहाणीत माझी सोन्याची चैन व अंगठी गहाळ झाली व मोबाईलही फुटला.

10 ते 15 दिवसापूर्वी सुशांत विधाते याने मला मारहाण केलेले फोटो दाखविले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार आम्ही घरच्यांना सांगितला. यानुसार चोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post