होमिओपॅथी एक प्रभावी उपचार आजाराचा समूळ नायनाट करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती उपयुक्त- डॉ. राखी रोहोकले

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- दिर्घ व जुन्या आजारांचा समूळ नायनाट करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती अत्यंत प्रभावीपणे उपयुक्त ठरत असल्याची माहिती होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉ. सौ. राखी रोहोकले (लामखडे) यांनी दिली.

     गुलमोहर रोड, सावेडी येथे वैभव होमिओपॅथिक क्लिनिकचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते डॉ. अजित फुंदे, डॉ. सोमनाथ गोपाळघरे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, निंबळक सरपंच सौ. प्रियंका लामखडे, युवा नेते अजय लामखडे, मधुकर रोहोकले, शरद ठाणगे, रमेश अनभुले, नानासाहेब गाडे, गंगाराम रोहोकले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
     त्याप्रसंगी बोलताना डॉ. राखी रोहोकले यांनी होमिओपॅथी उपचार पद्धती बद्दल सविस्तर माहिती दिली. 'होमिओपॅथी नेव्हर फेल' असे म्हटले जाते. प्रत्येक आजार व प्रत्येक लक्षणासाठी औषध आहेत. होमिओपॅथी उपचार पद्धतीने पूर्ण आजार बरा होऊन तो आजार पुन्हा उद्भवू नये यावर उपचार केले जातात. औषधांचे दुष्परिणाम नसल्याने रुग्णांचा कल दिवसेंदिवस होमिओपॅथी उपचार पद्धतीकडे सुरू असल्याचे डॉ. सौ. रोहोकले यांनी सांगितले.
      वैभव होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये लिव्हरचे आजार, पचनसंस्थेचे विकार, किडनीचे आजार, मुतखडा, संधिवात, सांधेदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड, ॲलर्जी, वारंवार सर्दी होणे, त्वचेचे आजार, सौंदर्य विषयक समस्या, केस गळणे, वजन कमी करणे, वजन वाढवणे, मणक्याचे आजार, मुळव्याध, ॲसिडिटी, लैंगिक समस्या, झोप न येणे, लहान मुलांचे आजार, स्मरणशक्ती वाढवणे, डायबेटीस, उच्च रक्तदाब, स्त्री पुरुष वंधत्व, बाल दमा, मेंदूचे विकार या सर्व आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत.

___________________________________________

डॉ. राखी रोहोकले (लामखडे) यांचा नावलौकिक

डॉ. राखी रोहोकले यांनी होमिओपॅथी उपचार पद्धतीने अनेक रुग्णांचे आजार बरे केले आहेत. आजाराचे अचूक निदान व त्यावर प्रभावी औषधोपचार करण्यात डॉ. सौ. रोहोकले यांचा हातखंडा आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण त्यांच्याकडे औषधोपचारासाठी येत असतात. दिर्घ, जुनाट आजार डॉ. रोहोकले यांच्या उपचार पद्धतीने बरे झाल्याचे अनेक रुग्ण आवर्जून सांगतात. त्यांच्या उपचार पद्धतीचा संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक असल्याचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांनी केला.

__________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post