आजादी का महोत्सव उपक्रमांतर्गत निंबळक गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट ; निंबळक ग्रामपंचायतवर कौतुकाचा वर्षाव

 माय अहमदनगर वेब टीम नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने आजादी का महोत्सव या उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

     ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः ग्रामपंचायतला भेट देऊन गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी गावामध्ये भूमिहीन, अत्यंत गरीब, घराची अत्यंत गरज असणाऱ्या, बेघर तसेच शासनाच्या निकषात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवर घरकुल मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायतने नियोजन करावे. त्यासाठी सदर पात्र लाभार्थी हा स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे असे सांगितले.

     निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिला मेळावे, कृषी शिबिर, स्वच्छता शपथ, निबंध स्पर्धा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. गावातील सर्व शासकीय कार्यालयांनी ध्वजाच्या रंगात विद्युत रोषणाई करून शासकीय कार्यालयांची सजावट केलेली आहे.      शाळेतील विद्यार्थ्यां मार्फत ध्वजाचे वाटप करण्यात आले होते. निंबळक गावातील माजी सैनिकांची त्रिदल संघटना यांचे यासाठी विशेष योगदान लाभले. संघटनेच्या वतीने ध्वज संहितेचे मार्गदर्शन ग्रामस्थांना करण्यात आले. तसेच माजी सैनिकांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता दि.१७ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर आधारित सामूहिकरीत्या चित्रपट दाखवून होणार आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

    निंबळक गावामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी सरपंच प्रियंका लामखडे, ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, विस्तार अधिकारी यांनी यावेळी गावात राबविण्यात येत असलेल्या प्रत्येक उपक्रमाची माहिती घेतली. सर्वांनीच निंबळक गावामध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

      यावेळी अजय विलास लामखडे, सोमनाथ खांदवे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायचे सर्व सदस्य व कर्मचारी, घनश्याम बाबा म्हस्के, अशोक कळसे, तोफीक पटेल, धामणे सर, भानुदास कोतकर, पालवे सर, मांडे सर, तलाठी मॅडम, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

___________________________________

निंबळक गावामध्ये आजादी का महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व उपक्रम नियोजन पध्दतीने गावामध्ये राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी, गावपातळीवरील अधिकारी व ग्रामस्थ यांचे उपक्रमातील योगदान खुपच मोलाचे ठरलेले दिसुन येते. शालेय विद्यार्थी व माजी सैनिकांची भुमिका ही महत्वपूर्ण राहीलेली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे गावातील उपक्रम लक्षवेधी ठरले आहेत. निंबळक ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

...... श्रीकांत खरात (गटविकास अधिकारी पंचायत समिती नगर)

____________________________________

तालुक्यातील इतर गावांसमोर आदर्श

निंबळक गावामध्ये आजादी का महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत नियोजन पद्धतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांची दखल सर्वत्र घेण्यात येत आहे. गावातील पदाधिकारी, अधिकारी, माजी सैनिक, शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी सामूहिक रित्या उपक्रमासाठी योगदान देऊन तालुक्यातील इतर गावांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

__________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post