माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर या ग्रामीण भागातून नगर मध्ये आलेल्या एस. पी. उद्योग समूहाने नवीन व्यवसायात पदार्पण केले असून "एस. पी. कलेक्शन द परफेक्ट मेन्स शॉप" या दालनाचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवार दि. १३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
एस. पी. उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक युवा नेते सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या उद्योग समूहाने अल्पावधीतच नावलौकिक मिळविला आहे. माळीवाडा येथील एस. पी. कलेक्शन मोबाईल शॉप गुणवत्ता व विश्वास यामुळे चांगलेच नावाजलेले आहे.
एस. पी. उद्योग समूह आता नवीन व्यवसायात पदार्पण करत असून कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर या परिसरात कापड व्यवसायात नावाजलेले मॅक्स या कंपनीची शाखा सुरू करत आहे. या नवीन दालनाचा शुभारंभ नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते जिल्हा लेबर फेडरेशनचे व्हाईस चेअरमन विकी शेठ जगताप, पुणे येथील मयूर अलार्म सिस्टीम कंपनीचे संचालक दत्तात्रय एकशिंगे, निधी एंटरप्राइजेसचे संचालक संदीप जगताप, नामांकित मॅक्स कंपनीचे संचालक सचिन नरवडे पाटील, युवा नेते सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
एस. पी. उद्योग समूहाने आज पर्यंत ग्राहकांची जपलेली विश्वासहार्यता व उत्तम दर्जा यामुळे एस.पी. उद्योग समूहाचे नाव जिल्ह्यात नावाजलेले आहे. यापुढेही ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा एस. पी. उद्योग समूहाचा मानस आहे. एस पी उद्योग समूहाच्या नवीन दालनाच्या उद्घाटनासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समूहाचे संचालक सूर्यकांत पवार, सुहास पवार, सागर पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
_________________________________________________________
Post a Comment