निंबळक पंचक्रोशीत १५० वटवृक्षांची लागवड जय हिंद सैनिक सेवा संघाचा पुढाकार ; ग्रामपंचायत करणार संवर्धन

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावच्या पंचक्रोशीत १५० वटवृक्षांची लागवड करण्यात आली असून या वृक्षांचे जतन व संवर्धन ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येणार आहे.

     जय हिंद सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांच्या पुढाकारातून वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ह.भ.प. अशोक महाराज पालवे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सरपंच प्रियंका लामखडे, उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या हस्ते वटवृक्षांची लागवड करण्यात आली. 

       निंबळक गावातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ह.भ.प. अशोक पालवे महाराज मठ, बोल्हेगाव रस्ता  या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. वडाच्या झाडांचे अनेक फायदे असल्याकारणाने या वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती शिवाजी पालवे यांनी दिली.

      याप्रसंगी अविनाश कोतकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, बाबा पगारे, अजय लामखडे, बाळासाहेब साठे, प्रदीप कोरडे, विष्णू होळकर, संभाजी सोनवणे, तोफिक पटेल, मंगेश रोकडे, दत्ता धावडे आदी उपस्थित होते.

__________________________________

 'ग्रीन अँड क्लीन' संकल्पना राबविणार 

निंबळक गावामध्ये 'ग्रीन अँड क्लीन' संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वच्छता व वृक्षारोपण यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येणार आहे. लावलेल्या झाडांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने घेतली आहे. त्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे तसेच लावलेल्या वटवृक्षांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प आहे.

.... सौ प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

__________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post