वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे -सपोनि. युवराज आठरे

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- प्रत्येक वाहनचालकाने वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होऊन अपघातात बळी जाणाऱ्या तसेच अपंगत्व प्राप्त होणा-यांची संख्या निश्चित कमी होईल, असे मत एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी व्यक्त केले.

      नगर औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी येथे भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड आणि कल्पतरु पावर ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीच्या वतीने सड़क सुरक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना सपोनि. युवराज आठरे यांनी सांगितले की, प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. तसेच आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट व इतर आवश्यक त्या गोष्टींची काळजी घ्यावी. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्याने अपघातांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन आठरे यांनी केले.

      नगर औरंगाबाद महामार्गावरुन जाणा-या वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच जे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना आढळून आले त्यांना बक्षीस देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन केले.

      याप्रसंगी अण्णासाहेब मगर, किशोर शिकारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी  अभय भांगे, अजित अकोलकर तसेच बी. जी. आर. एल. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक के. के. दामडे, प्रोजेक्ट लीडर बालाजी कायंदे, आशिष कुमार, कल्पतरु कंपनीचे प्रोजेक्ट लीडर विश्वजित ढाग, सुदीप वर्मा, शाहनवाज शेख, धिरज गेंट्याल आदि उपस्थित होते.

_____________________________________________


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post