राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के:कोकण विभागाने मारली बाजी



मुंबई ; राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला. 99.27 टक्के मिळवत कोकण विभागाने निकालात बाजी मारली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजेपासून पाहता येणार आहे.

असा पाहा निकाल

  • www.mahresult.nic.in
  • http://sscresult.mkcl.org
  • https://ssc.mahresults.org.in

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल पाहता येतील. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

अशी करा गुणपडताळणी

परीक्षेचा निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहीर झाल्यावर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती हव्या असतील, त्यांनी 20 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

विभागनिहाय निकाल

  • पुणे: 96.96%
  • नागपूर: 97%
  • औरंगाबाद: 96.33%
  • मुंबई: 96.94%
  • कोल्हापूर: 98.50%
  • अमरावती: 96.81%
  • नाशिक: 95.90%
  • लातूर: 97.27%
  • कोकण: 99.27%

16 लाख 36 हजार परीक्षार्थी

यंदा 2021-22 या वर्षाची दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 16 लाख, 36 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 8 लाख, 89 हजार विद्यार्थी तर 7 लाख, 49 हजार विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेसाठी राज्यभरात एकूण 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. 5 हजार 50 मुख्य केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post