पिंपळगाव माळवी येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन नामदार तनपुरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे- प्रा. काकडे

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका-नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून मतदार संघात विविध विकास कामे सुरू असल्याची माहिती नगर-पाथर्डी-राहुरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक प्रा. सिताराम काकडे यांनी दिली.

     नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन प्राध्यापक सिताराम काकडे यांच्या हस्ते अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती रघुनाथ झिने, रामदास ससे, डोंगरगण उपसरपंच संतोष पटारे, तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक महावीर गोसावी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

     त्यावेळी बोलताना काकडे यांनी कोरोनाच्या काळात मानसं जगवणे महत्वाचे होते. त्यामुळे विकास कामे ठप्प झाली होती. कोरोनाच्या काळात नागरिकांची काळजी घेण्याबाबत महाराष्ट्र सरकार देशात एक नंबरला होते. आता कोरोना संपल्यानंतर विकास कामे मोठ्या झपाट्याने सुरू झाली आहेत. ना. तनपुरे यांच्या निधीतून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असल्याचे काकडे यांनी सांगितले.

      रघुनाथ झिने यांनी पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी तनपुरे यांनी ५७ लाख रुपयांचा निधी दिला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागल्यामुळे ग्रामस्थांची सोय होणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी पिंपळगाव चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

______________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post