आधारसेवा केंद्रामुळे निंबळक ग्रामस्थांची सोय- सरपंच लामखडे निंबळक येथे आधार सेवा केंद्र सुरू

 माय अहमदनगर वेब टीम


 नगर तालुका-- नगर तालुक्यातील निंबळक येथे आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. आधार सेवा केंद्रामुळे निंबळक ग्रामस्थांची सोय झाली असल्याचे मत सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी व्यक्त केले.

      निंबळक गावात आधार सेवा केंद्राचे उद्घाटन सरपंच प्रियंका लामखडे यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे, संचालक मनोहर काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी गावामध्ये आधारसेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे. नागरिकांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे. आधार सेवा केंद्रामार्फत नागरिकांना चांगली सेवा देण्याचे आवाहन सरपंच प्रियंका लामखडे यांनी केले.

     संचालक मनोहर काळे यांनी सांगितले की, आधार केंद्रामार्फत नवीन आधारकार्ड, आधारकार्ड दुरुस्ती, लहान मुलांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, शिक्षणासाठी लागणारे सर्व दाखले, रेशन कार्ड यासंबंधी सर्व सेवा देण्यात येणार आहेत. निंबळक परिसरातील नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले. याप्रसंगी निंबळक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post