माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील इमामपूर गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येण्याबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
इमामपूर गाव हे गर्भगिरी डोंगराच्या तीव्र उतारावर वसलेले आहे. प्राकृतिक रचनेमुळे येथे उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. वर्षानुवर्ष दर उन्हाळ्यात इमामपुर ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येथे पाण्याची टंचाई जाणवते.
जलजीवन जीवन मिशन अंतर्गत बु-हाणनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत इमामपूर गावाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. इमामपूर गावाला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याच्या ठरावाची सूचना बाजीराव आवारे यांनी मांडली. तर अनुमोदन आकांक्षा टिमकरे यांनी दिले. या ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
_______________________________
इमामपूर गावचे वर्षानुवर्ष पाण्यासाठी हाल
इमामपूर गावच्या प्राकृतिक रचनेमुळे येथे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवते. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू असून तात्काळ कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याची गरज आहे. इमामपुर गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे.
......भिमराज मोकाटे (सरपंच इमामपूर)
____________________________________
Post a Comment