माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी सुमारे १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले असून त्यांचे कार्य अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन कांचन बिडवे यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त माहेर ब्युटी पार्लर च्या पुढाकारातून नगर शहरातून महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाडिया पार्क येथून रॅलीचा प्रारंभ झाला तर एकविरा चौक येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी सहभाग नोंदवत महिलांचा उत्साह वाढवला.
यावेळी बोलताना १०८ रुग्णवाहिकेच्या प्रमुख कांचन बिडवे यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांचे कार्य अविस्मरणीय असून त्यामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यांनी उभारलेल्या लढ्यामुळेच महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याचे बिडवे यांनी सांगितले. तसेच कांचन बिडवे यांनी १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेबद्दल प्रात्यक्षिक दाखवुन माहिती दिली.
कार्यक्रमासाठी ट्रेक कॅम्पचे विशाल लाहोटी, १०८ रुग्ण वाहीकेच्या जिल्हा व्यवस्थापक सुवर्णमाला गोखले, स्वप्ना वाळके, रेडिओ ऑरेंजचे गिरीराज, ऋषिकेश चव्हाण, ॲड. अनुराधा येवले, नगरसेवक सुनील त्रिंबके, सह्याद्री फायनान्सचे जनरल मॅनेजर मामासाहेब भालसिंग, मृणाल कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.
_______________________________________________
महिलांची रॅली इतरांसाठी प्रेरणादायी
महाराष्ट्र दिनानिमित्त नगर शहरातून प्रथमच महिलांनी बाइक रॅली काढली होती. आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्य करत आहेत. महिलांनी काढलेली बाइक रॅली ही निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी राहील.
...... कांचन बिडवे (प्रमुख १०८ रुग्णवाहिका)
_________________________________________________
Post a Comment