विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेला भारतीय सेवा रत्न बेस्ट एन जी ओ अवार्ड प्रदान

 


माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-- 

ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन तर्फे  देण्यात येणारा भारतीय सेवा रत्न बेस्ट एन जी ओ अवार्ड या वर्षी  विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेला पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे यांना सन्मानित करण्यात आले. 

    या सोहळ्याच्या निमित्ताने विशेषत्वाने अहमदनगर येथील दहा जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात येत असलेला मॉडेल स्कुल प्रकल्पाचे त्याच प्रमाणे शाळेतील वर्ग खोली डेंटिंग व पेंटींग आणि शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल या कामाचे विशेष  कौतुक करण्यात आले. अहमदनगर सोबत हे काम बुलढाणा आणि गुहागर येथे जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले आहे. या कामाचे विशेष  कौतुक करण्यात आले. 


कार्यक्रमाला भारतातील  जम्मू कश्मीर, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बेंगळूरु, पच्छिम बंगाल,पंजाब, हरियाना या राज्या मधून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था प्रतिनिधी, प्रत्रकार व लेखक मंडळीनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post