पाच रुपयावरून राडा; युवकाचा केला मर्डर६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल*

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - एमआयडीसी भागातील सह्याद्री चौक परिसरामध्ये मंगळवारी (दि.२६) एका वडापावच्या दुकानावर शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा बुधवारी (दि.२७) सकाळी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.या युवकाला मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

प्रवीण रमेश कांबळे (वय ३५, रा.दत्त मंदिराजवळ बोरुडेमळा,बालिकाश्रम रोड) असे मयत युवकाचे नाव आहे.मंगळवारी (दि.२६) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास या प्रकरणातील मयत प्रवीण कांबळे हा एका वडापाव च्या दुकानावर वडा खाण्यासाठी गेला होता. मात्र दुकानदाराने त्याला वडापाव २० रुपये ला असल्याचे सांगितल्यानंतर पाच रुपये कमी करा या गोष्टीवरून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली आणि या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले.

वडापाव दुकानदाराच्या मदतीला आसपास असलेल्या काही लोकांनी मदत करून प्रवीण कांबळे याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर प्रवीण यास गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र बुधवारी (दि.२७)सकाळी प्रवीण कांबळे हा मयत झाला आहे. प्रवीण कांबळे याच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

. यामध्ये अमोल बाबासाहेब सोनवणे, अमोल भाऊसाहेब साळवे, बबड्या उर्फ बाबासाहेब केरू गव्हाणे (तिघे रा. रोकडेमळा,नवनागापूर), पुरुषोत्तम कुमार गुप्ता, अरुण नारद सहा, संकेत विठ्ठल सोमवंशी (रा.गजानन कॉलनी, नवनागापूर)यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून अजून काही आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post