भैरवनाथ मंदिर परिसरात संशयितरित्या फिरणार्‍या 5 जणांना बेड्या, काय होता प्लॅन...?

 


माय अहमदनगर वेब टीम 

-आगडगाव (ता.नगर) येथील भैरवनाथ मंदिर परिसरात पहाटे तीनच्या  सुमारास संशयितरित्या फिरणार्‍या पाच जणांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. 

दि. 26 रोजी पहाटे तीनच्या सुमारास आरोपी हे त्यांच्या तोंडाला रूमाल व उपरणे बांधून त्यांची ओळख लपवून त्यांच्या ताब्यातील वाहनासह (क्रमांक एमएच 12 जी.व्ही.5702) काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या आढळून आले. याप्रकरणी सहायक फौजदार भास्कर लबडे यांनी फिर्याद दिली आहे.  बाळकृष्ण नामदेव खताळ (वय 26, रा. आडगाव, ता. पाथर्डी), प्रदीप बाबासाहेब खेमनर (वय 23, रा. माका), किशोर उत्तम कुसळकर (वय 26, रा. माका), दत्तात्रय भागवत म्हस्के (वय 25, रा. रेणुकाईवाडी, ता. पाथर्डी), दीपक मोहन तोगे (वय 31, रा. मिरी, ता. पाथर्डी) यांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post