'तिची' बदनामी भोवली, 'त्याचा' झाला गेम



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - तरूणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करून बदनामी करणार्याी आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तेजस भिवसेन ठाणगे (वय 21 रा. तलाठी कार्यालयाशेजारी, सावेडी गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका तरूणीने फिर्याद दिली होती. सायबर पोलिसांनी भादंवि कलम 500 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वहर भोसले, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेगषण केले. बनावट अकाऊंट तयार करून फिर्यादी तरूणीची बदनामी करणारा आरोपी ठाणगे यांचे नाव तपासाअंती समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान सोशल मीडियावरील व्हाट्सअॅरप, इंस्टाग्राम, फेसबुक अकाऊंट हे प्रायव्हसी लॉक करावे, अनोळखी व्यक्तींची फें्रड रिक्वेस्ट स्विकारू नये, असे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post