धक्कादायक! नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी; केली दगडफेक



माय अहमदनगर वेब टीम -

अहमदनगर महापालिकेचे नगरसवेक अमोल येवले यांना अज्ञात तिघांकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. तसेच आरोपींनी दगडफेक करत दोन चारचाक्यांचे नुकसान केले आहे. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        अभिजीत अर्जुन कोतकर (वय ३२, रा. कोतकर मळा, केडगाव, अहमदनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शनिवार दि. ९ एप्रिल रोजी रात्री एकच्या दरम्यान दुचाकीवरून तिघे कोतकर यांच्या हॉटेल सागर नेते याठिकाणी आले. आरोपींनी चेहरे पुर्णपणे झाकलेले होते. त्यातील एका आरोपीने हॉटेलवरील कामगाराला कुठे आहे तो अमोल येवले, असे विचारले. तसेच त्यानंतर तुम्ही इथून निघून जा, येथे अमोल येवलेचा मर्डर होणार आहे, असे आरोपी म्हणाले. काही काळ आरोपींनी तेथे धिंगाणा घातला आणि नंतर हॉटेलसमोर असणार्‍या चारचाकी गाड्यांवर दगडफेक सुरू केली. यामध्ये ह्युंडाई क्रेटा (एमएच १६ बीएच ३९०३) आणि टाटा अल्ट्रोज (एमएच १६ सीव्ही ६३३३) यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोतवाली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post