इमामपूर येथुन मुरूम चोरीला गेल्याची तक्रार

 माय अहमदनगर वेब टीम

 नगर तालुका-- नगर तालुक्यातील इमामपूर येथून सुमारे ६० ब्रास मुरुम चोरीला गेला असल्याची तक्रार नंदा नानासाहेब मोकाटे यांनी दिली आहे.

      महसूल विभाग व एम.आय.डी. सी.पोलीस स्टेशनला नंदा मोकाटे यांनी आपल्या शेतातील गट नंबर


५२० मधून सुमारे ६० ब्रास मुरुम चोरीला गेला असल्याबाबत चा तक्रार अर्ज दिला आहे. सोमवार दि.११  रोजी मुरुम चोरीला गेला असल्याची तक्रारीत म्हटले आहे.

     याबाबत महसूल विभागाच्या वतीने मंडळाधिकारी वृषाली करोसिया, तलाठी सुदर्शन साळवे, तलाठी सरिता मुंडे यांनी पंचनामा केला आहे. सदर घटनेचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाधिकारी करोसीया यांनी दिली.

      परिसरातुन मुरूम चोरीला जात असल्याने परिसरात खळबळ उडाली असून मुरुम चोरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post