प्राचार्यांसमोर विद्यार्थ्याचा राडा; घटनेचा व्हिडीओ CCTVमध्ये कैद पुणे | पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, या प्रकरणास आता वेगळंच वळण आलं आहे. विद्यार्थ्याने स्वत:चे डोकं फोडलं आहे. हा सर्व प्रकार आता समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पिंपरी चिंचवडच्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिक्षण घेणारा कैलास बारूट मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयानं राज्य शासनाच्या परिपत्रकानुसारच शुल्क आकारावं, असं महाविद्यालयास सांगितलं होतं. या सर्व घटनेनंतर शिक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप कैलासनं केला होता.

महाविद्यालयातील शिक्षकांनी 23 वर्षीय विद्यार्थ्यास मारहाण केल्याच्या घटनेमुळं एकच खळबळ माजली होती. मात्र, आता घटनेची वस्तुस्थिती समोर आली आहे. विद्यार्थ्यानेच प्राचार्यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे. स्वत:चं डोकं आपटून घेऊन जखमी झालेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, स्वत:चं डोकं आपटून घेऊन कैलास पळून गेला होता. त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून ठेवलं आहे, असं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. महाविद्यालयाने पोलिसांत तक्रार केली असून, पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post