मुंबई | कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात हालचाली सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याणमधील चक्की नाका ते नेवाळी रस्त्याची पाहणी केली. तेथील रस्त्यांची अवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कल्याण-डोंबिवलीत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसामुळे तर खड्ड्यांची समस्या आणखीनच वाईट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यावरुन आता मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रस्त्यांची अवस्था पाहून राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आता सहनशीलतेचा अंत झालाय, खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. येत्या 15 दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरावं लागेल, असा इशाराही आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना दिला आहे.
दरम्यान, आमच्यावर केसेस केल्या तरी करू द्या. आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. कल्याणमध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत, असंही राजू पाटील यांनी म्हटलं.
Post a Comment