तळेगाव दिघे | संगमनेर (Sangamner) तालुक्यातील तळेगाव दिघे (Talegoan Dighe) शिवारात कार व दुचाकीची भीषण धडक (Car And Two-Wheeler Accident) होत अपघात झाला.
या अपघातात (Accident News) दुचाकीस्वार डोक्याला मार लागून जबर जखमी झाला. सोमवारी (दि. २०) रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर (Loni-Nandurshingote Road) तळेगाव दिघे शिवारात हॉटेल सौरभ नजीक ही अपघाताची घटना घडली.
तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने निमोण प्राथमिक आरोग्य केंद्राचे (Nimon Primary Health Center) वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश चांदोरकर नगरहून हे निमोणच्या दिशेने वॅग्नर कार (एमएच १५ एफएन ७५४० ) मधुन प्रवास करीत होते. दरम्यान समोरून आलेल्या दुचाकीची (क्र. एमएच १५ जीएच ८६४३ ) व वॅग्नर कारची धडक होत भीषण अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वार सुनील जगन्नाथ भडांगे (रा. कौठेकमळेश्वर) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जबर जखमी झाले. त्यांना तातडीने प्रथम संगमनेर व त्यानंतर पुणे येथे रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात प्रसंगी डॉ. संतोष डांगे, राहुल बायकर, मनोज दिघे, राजू भडांगे, सचिन जोंधळे यांनी मदतकार्य केले. अपघाताच्या घटनेबाबत स्थानिक युवकांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली.
Post a Comment