संगमनेरमधल्या बस स्थानकात (Sangamner Bus Stand) ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे मयत बस चालकाचे नाव आहे.
संगमनेर बस स्थानकावर सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास एम. ए. 14, बी. टी. 4887 क्रमांकाच्या पाथर्डी-नाशिक बसमध्ये त्याच बसचे चालक असलेले सुभाष शिवलिंग तेलोरे यांनी उभ्या बसमध्येच गळफास घेवून आत्महत्या केली. तेलोरे यांनी आत्महत्या का केली? याचे निश्चित कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेलोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे हे अधिक तपास करत आहे.
Post a Comment