आजपासून HDFC बँकेच्या सेवा 18 तास राहणार बंद; जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहील?

 


डिजिटल बँकिंग सेवेत आणखी सुधारणा आणण्यासाठी एचडीएफसी बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बॅकेनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून उद्यापर्यंत म्हणजे सलग 18 तास एचडीएफसी बँकेच्या काही सेवा बंद राहणार आहेत. बँकेने तशी माहिती ई-मेलव्दारे आपल्या ग्राहकांना पाठवलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अशावेळी बँकेत काय सुरु आणि काय बंद राहिल हे आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या सेवा बंद राहणार?
बॅंकेने दिेलेल्या माहितीनुसार, या वेळेत नेटबॅकिंग आणि मोबाईलवरील बॅकिंग सेवा बंद राहणार आहे. जर तुम्हाला नेटबॅकिंग आणि मोबाईल बॅकिंग संदर्भात काहीही काम असेल तर ते आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला दोन दिवस याची वाट पाहावी लागेल.

कोणत्या वेळेत राहणार बंद?
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना 18 तास या सेवांचा लाभ घेता येणार नाहीये. बँकेची ही सेवा 21 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेपासून 22 ऑगस्टच्या दुपारी 3 पर्यंत बंद राहणार आहे. या गैरसोयीबद्दल बँकेनेही खेद व्यक्त केले आहे.

ग्राहकांना असा मॅसेज पाठवण्यात आला आहे?
प्रिय ग्राहक, एचडीएफसी बँकेबरोबर बँकिंग केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की, तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित असाल. आपल्याला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी आमच्या सतत प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही नियोजित देखभाल करत आहोत. या उपक्रमादरम्यान कर्जाशी संबंधित सेवा प्रभावित होतील. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post