'ते' गूढ कधीही उकलणार नाही - पवार


माय अहमदनगर वेब टीम
पुणे - मी माझं गूढ कधीही उकलणार नाही. मला बंधन घालू नका, असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  यांनी केलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारस्थापण्याच्या केलेल्या प्रयत्नाबाबत पवार यांनी हे सूचक विधान केलं. आता पुन्हा भाजप शिवसेनेला अप्रत्यक्षपणे सत्तास्थापनेची ऑफर देत आहे, त्याबद्दल विचारता ते म्हणाले, 'कोणी कोणालाही ऑफर द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण आता महाआघाडीचे सरकार स्थापन झालं आहे.'
पवार म्हणाले, 'राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची विचारसरणी साधारणपणे एकच आहे. शिवसेनेची विचारसरणी वेगळी आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. पण राज्यात जी परिस्थिती निर्माण झालीय त्या परिस्थितीत महाविकास आघाडी तयार झालीय. ज्यावेळी असं कोअॅलिशन गव्हर्नमेनंट असतं तेव्हा ज्यामधे मतमतांतर असतं ते विषय मागे ठेवायचे असतात. ज्यात लोकांचं हित असतं, महाराष्ट्राच हित ज्यात आले अशा विषयांना अग्रक्रम द्यायचा असतो.' पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील मंत्रिपद वाटपाबाबतही ते बोलले. विकासकामे मार्गी लावण्यासाठीच अर्थ खातं राष्ट्वादीकडे ठेवलं, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एखादं खातं मिळू शकते... थोडं थांबा, असं सूचक विधानही त्यांनी केलं. तिन्ही पक्षांनी वाद टाळले तर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पाच वर्षं टिकेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post