भाजपचा ओबीसी चेहरा किशोर डागवाले यांचा उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

 


माय नगर वेब टीम

अहिल्यानगर - भारतीय जनता पार्टीचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवाले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. यानिमित्ताने सायंकाळी ६ वाजता पटवर्धन चौकात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचा ओबीसी चेहरा असलेले डागवाले यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या चांगल्याच चर्चा शहरात रंगल्या आहेत. 

 डागवाले यांचा संभाव्य पक्ष प्रवेश हा भाजपासाठी मोठा धक्का ठरणार असून अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post